web-ads-yml-750x100

Breaking News

सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ ठाणे व टाटा कॅपिटल सुविद्या प्रोजेक्ट विद्यमाने क्रीडा स्पर्धा संपन्न

BY – युवा महाराष्ट्र लाइव – ठाणे  |
सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ ठाणे व टाटा कॅपिटल सुविद्या प्रोजेक्ट विद्यमाने  नांदगाव येथील नामदेव विद्यालयाच्या प्रांगणात विविध क्रिडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी टाटा कॅपिटल सुविद्या प्रोजेक्टचे प्रकाश महाडिक सर यांच्या अध्यक्षतेखाली या स्पर्धा घेण्यात आल्या. यात प्रामुख्याने लांब उडी, उंच उडी,गोळा फेक, सिंगल बार, डबल बार या खेळांचा समावेश होता यावेळी सुधागड तालुक्यातील पंधरा शाळांतील दोनशेहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला नांदगाव शाळेचे प्राचार्य निंबाळकर सर,पेडली माध्यमिक शाळेचे गोळे सर, नाडसूर हायस्कूलचे ठाकूर सर वाघोशी हायस्कूलचे मुख्याध्यापक धर्माधिकारी सर यांचे मोलाचे सहकार्य लाभले तसेच यावेळी अध्यक्ष विठ्ठल घाडगे, उपाध्यक्ष शंकर काळभोर, शिक्षण समिती प्रमुख वसंत लहाने, उपखजिनदार विजय जाधव, संस्थेचे सल्लागार विठ्ठल खेरटकर, क्रिडासमितीप्रमुख राकेश थोरले, सचिव अविकांत साळुंखे हे उपस्थित होते.

No comments