0
BY - मन्साराम वर्मा ,युवा महाराष्ट्र लाइव - मुंबई |
भरधाव दुचाकी गतीरोधकावरून उडून समोरून येणाऱ्या कारला धडकल्याने दुचाकीवरील दोघे ही तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना अंबरनाथ शहरातील रॉयल पार्क परिसरात घडली. या घटनेचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या प्रकरणी अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Post a comment

 
Top