web-ads-yml-750x100

Breaking News

गेट वे ऑफ इंडियाजवळ आंदोलन सुरू, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड सुद्धा पोहोचले

BY - युवा महाराष्ट्र लाइव - मुंबई |

दिल्लीतील जवाहलाल नेहरू विद्यापीठात शुल्क वाढीविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला रविवारी रात्री हिंसक वळण लागले.यामध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांना मारहाण करण्यात आली. यामध्ये शिक्षिकेसह 20 विद्यार्थी जखमी झाले. या प्रकारानंतर विद्यापीठ परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. मात्र या घटनेचे पडसाद देशभरात उमटले. मुंबई पुण्यामध्ये यासाठी विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहे. रात्रीपासून आंदोलने केली जात आहे. गेटवे ऑफ इंडियावर अजूनही आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात आता राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड देखील पोहोचले आहेत.

No comments