web-ads-yml-750x100

Breaking News

म्हसा यात्रा म्हणजे सुरक्षेतेचा आभाव आणि लुटारूची जत्रा...( स्टोरी लेखक : नामदेव शेलार,संपादक)

देशात परदेशात नावजलेली म्हसा यात्रा आता हळुहळु लोभ पावत चालली आहे.पुर्वीची जत्रा पारंपारिक महिनाभर चालणारी जत्रा होती मात्र आता जत्रेचा ओग कमी होऊ लागला आहे.जत्रेचा क्षेत्र कमी होऊन जत्रा आठवडा बाजारासारखी बनली आहे.दोन दिवसाची जत्रा म्हणुन नावारूपाला उरली आहे.खांबलिंगेश्‍वर जत्रेचा महिमा नवसाला पावणारा म्हसोबा असा आहे.परंन्तु पुर्वीच्या आणि आजच्या म्हसा यात्रेत प्रचंड फरक पडला आहे.
पुर्वी जनावरांचा बाजार 15 दिवस चालायाचा आज हाच बैलबाजार दोन दिवसावर आला आहे.पुर्वी म्हसा परिसरात रानमाळात जत्रेचा स्वरूप होते आज जत्रा रस्त्यावरील दुकांनावरच उठुन दिसत आहे.पुर्वी रानमाळात अपुर्‍या सुरक्षेत जत्रा यशस्वी होत होती आज असुरक्षेतेत आणि लुटारूच्या जत्रा सापडली आहे.राजकारणी अधिकारी कर्मचारी यांचा लुटारू भ्रष्टावली अडडा बनली आहे.जत्रेच्या नावाखाली पैशाची लुट चालली आहे.कुठे नियतीचा खेळ पहाण्यास मिळतोतर कुठे जत्रेतील व्यापारी दुकानदार यांना लुटमारी टोळी कार्यरत असताना दिसत आहे.म्हणुन म्हसा यात्रेकडे लाखो भाविकानी पाठ फिरवल्याचे चित्र समोर आले आहे.रस्ता मोठा झाला मात्र रस्त्याच्या मध्योमध्य असलेली दुकाने असुरक्षेतेची हमी देवु शकत नाहीत पुर्वी जनावराना माणसाना लस टोचुन आरोग्याची काळजी घेतली जात होती आज जनावरे माणसं यांची आरोग्य धोक्यात आले आहे.धुळीचे रस्ते मुरबाड म्हसा रस्ता आपघाताला आमंत्रण ट्रॉफिक जाम दुर्षीतपाणी आरोग्य सुविधा सौचालयाच्या आभाव आणि विद्युत पुरवठयात लाखोची चोरी त्यातुन विद्युत मंडळाच्या अधिकार्‍यांनी उभे केलेले राजकीय दलाल याकडे शासनाचे झालेले दुर्लक्ष म्हणजे सुरक्षेतेचा अबाव आणि लुटारूची जत्रा.
म्हणे लोकप्रतिनिधीसह तहसिलदारानी मिटींगवर मिटींगी घेतल्या कशासाठी त्यातुन काय उपयोजना आखली म्हसा तलाठी सजाचे तलाठी म्हणाला आम्ही आपत्तीचे रक्षक कोण मेला गेला काय झालं तर पंचनामा करतो संगळा निधी ग्रामपंचायत जमा करते विजचोरी विद्युत मंडळाच्या आत्यारिक्त येते अशा प्रतिक्रिया देताना आपत्तीआल्यावर पंचनामा मात्र आपत्ती येणार नाही म्हणुन उपयोजना नाही ही खेदाची बाब आहे.म्हसा यात्रेत 10 हजाराच्यावर दुकाने असतात त्यांना विद्युत लार्इन देवुन एका बलपचे पाचशे ते एक हजार रूपये घेतले जातात.मनोरंजन पाळणेवाला यांना मिटर देताना लाख रूपयाच्यावर पैसे घेतले जातात.शिवाय विद्युत मिटरचे बिल दिले जाते हे सर्व कागदोपत्री नाही विद्युत मंडळाचे अधिकारी लार्इट देण्यासाठी राजकीय विद्युत ठेकेदाराला दलाली म्हणुन उभे करून शासनाच्या लाखो रूपायाची विद्युत चोरी करतात इकडे मात्र विद्युत मंडळाचे अधिकारी गरीबाचे आकडे पकडल्यावर हजारो रूपये दंड ठोकुन गुन्हें दाखल करतात अशा विकासाच्या गप्पा नेत्याच्या म्हसा यात्रेत चाललेला लुटारूपणा केव्हा थांबणार
सरकार कोणाचाही असो भ्रष्टाचाराला मर्यादा हवी सुरक्षेतील प्राधान्य हवे आरोग्याच्या सोयी हव्यात आपत्त्कालीन यंत्रणेचा धाक हवा नियोजन हवे मात्र तसं म्हसा यात्रेत नाहीत म्हणे म्हसा यात्रेची मिटींग संपन्न शौचालयापासुन पैसे खाणारे पाण्यापर्यंत जातात देवाच्या नावाने बाजार मांडला जातो अशी म्हसा यात्रा सुरू झाली मात्र तिचा ओग ओसरला....
चोर्‍या हाणामार्‍या पॉकीटमारी दरवर्षी असते दारू मटका गुटखा जुगार दरवर्षी असतो ट्रॉफिक जाम दरवर्षी रस्त्यात चालण्यासाठी जागा नाही मात्र पोलिसाचं पाळण्याला संरक्षण जास्त असते राजकारण्याच्या गाडया अवैधप्रवाशी वाहातुक वाहाने आत सोडतात मात्र पत्रकाराच्या वाहानाना बंदी असते ही बेबंदशाही थांबली पाहिजे दरवर्षी आपली नाचकी मिडियात होत असताना त्यामध्ये  दरवर्षी सुधारणा होत नाहीत याला जत्रेचं नियोजन म्हणावे की जत्रेत लुटमारी असा सवाल यात्रेकरूना पडला आहे.
म्हसा यात्रेत हजारो वाहाने येतात त्यांना नियोजीत पार्कींग सोय नाही पार्कींगला हवे तसे पैसे दयावे लागतात रस्ते धुळवडीवर पाणी टाकले जात नाही म्हणे सीसीटीव्ही कॅमेरे लावले जातात मात्र आंधळ दळतयं कुत्र पिठ खातंय हे सीसीटिव्ही कॅमेर्‍यात कैद होत नाही अशीच म्हणावी का यात्रा?
अन्न औषधे अधिकार्‍यांची हप्तेगिरी
आज आरोग्याची साथ सुरू आहे.त्याचं जतन करताना म्हसा यात्रेत रस्त्यावरील गल्लीबोलातील मिठार्इ दुकानदार हॉटेल थंडपेय यांची तपासणी होत नाही काहीही कसही यात्रेकरूना खावं लागतं  खरेदी करावं लागतं आरोग्याच्या साथीला सामोरे जावं लागतं याकडे पुर्णता दुर्लक्ष
एका मिठार्इ दुकानदार सुनिल घुले याचा गेली 40 वर्षे वडिर्लोपौर्जित दुकान  होतं त्यांच्या दुकानाची जागाच ग्रामपंचायतीने दुसर्‍या दुकानदाराला पैशापोटी दिली त्याच संतापलेल्या दुकानदार महिलेने ग्रामपंचायतीच्या त्या कोणी माझी जागा पैशाच्या हव्याशीपोटी दुसर्‍या दुकानदाराला दिली त्याचा वाटोळा होर्इल अशी शिवीगाळ शाप दिला मुलाबाळाला शाप दिला अशी म्हसोबाची जत्रा खरचं म्हसोबा पावल का?
मिठार्इ दुकानदाराच्या अस्वच्छता खाणावळीची अस्वच्छता घाणीचे साम्राज्य याकडे अन्न औषधे आरोग्य विभागााने लक्ष वेधले पाहिजे मोठया गप्पा मारून विकास होत नाही आणि आरोग्य रस्ते असुरक्षतेने यात्रा यशस्वी होत नाही याचा अनुभव गप्पा धारकाना आला असेलच मात्र म्हसा यात्रेत सर्वात जास्त विजचोरीतुन होणारा भ्रष्टाचारावर कारवार्इ झाली पाहिजे यात्रेचे नियोजन यशस्वी जेव्हा होर्इल तेव्हा सार्‍या सुविधा सुरक्षा यात्रेकरूना मिळतील म्हसा यात्रेत दारू येतेच गुटखा येतोच पिणारे पितात मग सारं कुठुन येतयं…..!      (रोज वाचा म्हसा मालिका)

No comments