web-ads-yml-750x100

Breaking News

अमेरिकेचा बगदादवर दुसरा हवाई हल्ला

BY - युवा महाराष्ट्र लाइव – बगदाद |
अमेरिकेने सलग दुसऱ्या दिवशी इराकची राजधानी बगदादमध्ये हवाई हल्ला करण्यात आला आहे. यामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला. गुरुवारी रात्री उशीरा अमेरिकेने बगदाद एअरपोर्टवर हल्ला करत  इराणच्या लष्कराचे वरिष्ठ कमांडर जनरल कासीम सुलेमानी यांना ठार मारलं. अमेरिकेने हा हल्ला बगदादच्या महत्वाच्या शहरावर केला आहे. या हल्यामध्ये मारले गेलेले हे इराण समर्थक मिलिशिया हश्द अल-शाबी असल्याचे वृत्त आहे. हश्द अल-शाबी ईराण समर्थक हे प्रसिद्ध मोबलाइजेशन फोर्सेसचे दुसरे नाव आहे.

अमेरिकेने केलेल्या हल्ल्यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर 3 जण गंभीर जखमी आहेत. या हवाई हल्ल्यात इराण समर्थक मिलिशिया हश्द अल शाबीच्या काही लोकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. हश्द अल शाबी हा इराण समर्थक प्रसिद्ध मोबलाइजेशन फोर्सेसचे दुसरे नाव आहे. बगदादमध्ये करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यामध्ये दोन वाहनांना लक्ष्य करण्यात आले. त्यामुळे या वाहनातून प्रवास करणाऱ्या सहा जण ठार झाले. या हल्ल्यात हश्द अल शाबीच्या एका मोठ्या नेत्याचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. मात्र याला अद्याप कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

No comments