Breaking News

युद्धात एकही अमेरिकी सैनिक जखमी नाही - ट्रम्प

BY - युवा महाराष्ट्र लाइव – नवी दिल्ली |
इराण हल्ल्यानंतर बुधवारी माध्यमांना संबोधित करताना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की आमच्या लष्करी तळाला किरकोळ नुकसान झाले आहे. पण कोणताही सैनिक मारला गेला नाही. ट्रम्प म्हणाले की आमच्याकडे मोठी सेना आहे. ते म्हणाले की आम्ही कासिम सुलेमानीची हत्या केली आहे. सुलेमानी यांनी अमेरिकन सैनिकांच्या हत्येचा कट रचला होता डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की मी अध्यक्ष होईपर्यंत इराणला कधीही अण्वस्त्रे बाळगण्याची परवानगी दिली जाणार नाही. तसेच इराणने केलेल्या युद्धात एकही अमेरिकी सैनिक जखमी नसल्याची माहिती डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली.

No comments