0
BY – युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या http://stateexcise.maharashtra.gov.in आणि  http://exciseservices.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर सशुल्क मद्य सेवन परवाना उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.मद्य सेवन करण्याकरिता परवाना आवश्यक आहे. परवाना असणाऱ्या व्यक्तीस खाजगी ठिकाणी मद्य सेवन करण्यास अथवा बाळगण्याची इतर कोणत्याही अनुज्ञप्तीची आवश्यकता नसते. मद्य सेवन परवाने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून ही सशुल्क सेवा आहे.विशेष कार्यक्रमासाठी एकदिवसीय अनुज्ञप्ती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नियमातील तरतुदीनुसार आवश्यक आहे. अनुज्ञप्ती मद्यविक्री परवानगी नसलेल्या सार्वजनिक ठिकाणी मद्यविक्री करावयाची असल्यास तात्पुरत्या स्वरुपात देण्याची तरतूद आहे. विशेष कार्यक्रमाच्या एकदिवसीय अनुज्ञप्तीसाठी किती व्यक्ती उपस्थित असाव्यात याबाबत कोणतेही बंधन नाही. केवळ व्यावसायिक कार्यक्रमांसाठी उदाहरणार्थ आयपीएलसारखे क्रीडा प्रकार किंवा इतर मोठे मनोरंजनात्मक कार्यक्रमांसाठी अनुज्ञप्ती शुल्क अधिक घेण्यात आले आहे.महाराष्ट्र दारुबंदी कायदा, 1949 कलम 11 नुसार ज्या व्यक्तीकडे या कायद्यान्वये दिलेला परवाना असल्यास अशी व्यक्ती मद्य बाळगणे, मद्याची खरेदी व वाहतूक करु शकते. याकरिता 'एफएल-एक्ससी' परवाना घेणे आवश्यक असते, असे राज्य उत्पादन शुल्क विभागाने कळविले आहे.

Post a comment

 
Top