Breaking News

इराणमध्ये युक्रेनच्या विमानाचा अपघात

BY - युवा महाराष्ट्र लाइव – तेहरान  |
इराणची राजधानी तेहरानमध्ये युक्रेनचे विमानच्या विमानाला अपघात झाला आहे. तेहरान विमानतळाजवळ कोसळलेल्या विमानामध्ये 180 प्रवासी असल्याची माहिती समोर आली आहे. युक्रेन एअरलाइन्सचे बोईंग 737 या विमानाने तेहरान विमानतळावरून उड्डाण घेतले होते. मात्र यानंतर अवघ्या काही वेळेतच विमान खाली कोसळले. विमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. अपघातग्रस्त विमान हे युक्रेनची राजधानी कीव येथे जात होते. विमानामध्ये 180 प्रवासी आणि क्रू होता. बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे.

No comments