0
BY – युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
शांतता व सुव्यवस्थेसाठी झटणारे तसेच संकटकाळी इतरांच्या बचावासाठी प्राणपणाने कामगिरी बजाविणाऱ्यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उल्लेखनीय कामगीरीसाठी राष्ट्रपती पदक पटकाविणाऱ्या पोलीस अधिकारी, कर्मचारी, तसेच जीवन रक्षा आणि अग्निशमन सेवा पटकाविणाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी अभिनंदन करताना म्हटले आहे की, ‘महाराष्ट्राला शौर्यांची दिमाखदार परंपरा आहे. याच परंपरेत पोलीस दलातील वीरांसह, संकटकाळी इतरांच्या बचावासाठी प्राणाची बाजी लावणारे आणि आगीसारख्या दुर्घटनेत सर्वात पुढे राहणाऱ्यांनी आपल्या उत्कृष्ट कामगिरीने भर घातली आहे. या पदकामुळे राज्याच्या लौकीकात भर घातली आहे.  या सर्वांची कामगिरी पुढे अनेकांना प्रेरणादायी ठरेल. या सर्वांचा सार्थ अभिमान आहे,’प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय गृहमंत्रालयाने राष्ट्रपती पोलीस पदक, जीवन रक्षा पदक, अग्निशमन सेवा पदक, नागरीसेवा दल पदक आदींची घोषणा केली. यामध्ये महाराष्ट्रातील 54 पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसह जीवन रक्षा पदकासाठी पाच व्यक्तींचा आणि अग्निशमन सेवा पदकासाठी सात अग्निशमन अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.पोलीस दलालीत 10 पोलीस अधिकाऱ्यांना पोलीस शौर्य पदक, 4 पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती विशिष्ठ सेवा पदक तर 40 पोलिसांना गुणवत्ता सेवा पदक तर संकटात सापडलेल्यांना वाचवून मानवतेचा आदर्श निर्माण करणाऱ्या 5 व्यक्तींना जीवन रक्षा पदक जाहीर झाले आहे. तसेच अग्निशमन सेवेमध्ये उल्लेखनिय कामगीरीसाठी 7 अग्निशमन अधिकारी व कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती शौर्य पदक जाहीर झाले आहे.

Post a comment

 
Top