web-ads-yml-750x100

Breaking News

माहिम ते माटुंगा मार्गावर रेल्वे रुळाला तडे

BY – युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
पश्चिम रेल्वेच्या माटुंगा आणि माहीम स्थानकांदरम्यान रेल्वे रुळाला तडे गेले आहे. यामुळे चर्चगेटकडे येणाऱ्या धीमी वाहतूक विस्कळीत झाली आहे. यानंतर धीम्या मार्गावरील वाहतूक जलद मार्गावर वळवण्यात आली आहे. ऐन गर्दीच्या वेळी वाहतूक विस्कळीत झाली आहे. यामुळे प्रवाशांची गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

पश्चिम रेल्वेकडून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. दरम्यान जलद मार्गावर वळवण्यात आलेल्या लोकल माटुंगा, प्रभादेवी, लोअर परळ आणि महालक्ष्मी या चार स्थानकांवर थांबणार नाहीत. यामुळे या चार स्थानकांवरील प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे.

No comments