web-ads-yml-750x100

Breaking News

२० जानेवारी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मृती व्यंगचित्रकला स्पर्धेसाठी व्यंगचित्र पाठवण्याचे आवाहन

BY – युवा महाराष्ट्र लाइव – ठाणे |
शिवसेवा मित्र मंडळ, ठाणे पूर्व तर्फे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या २३ जानेवारी जयंती प्रित्यर्थ व्यंगचित्रकला या लोकप्रिय कलेचा प्रसार, प्रचार व्हावा या निमित्ताने व्यंगचित्रकला स्पर्धा आयोजित केली आहे. स्पर्धेचं हे ६वे वर्ष असून, या व्यंगचित्रकला स्पर्धेसाठी वयवर्ष १० वरील बालव्यंगचित्रकार, हौशी तरुण व ज्येष्ठ व्यंगचित्रकार यांनी “व्यंगचित्रांच्या माध्यमातून समाज प्रबोधन” या विषयावरील आपली व्यंगचित्र, अे ३ साईझ ( ४२ X ३० सेंमी ) पेपर मध्ये, तसेच व्यंगचित्राच्या मागे आपले संपूर्ण नाव, आपली जन्म तारीख/वय , मोबाईल नंबर, आपला पूर्ण पत्ता व बालव्यंगचित्रकारांनी आपल्या शाळेचं नाव लिहून शिवसेना शाखा, मंगला हिंदी शाळेसमोर, कोपरी, ठाणे पूर्व ४००६०३ येथे दि. २० जानेवारी २०२० पर्यंत सायं ७ ते ९ या वेळेत पोहचवावीत. परीक्षकांनी निवडलेल्या निवडक व्यंगचित्रांचे प्रदर्शन दि. २३ जानेवारी २०२० रोजी सकाळी ११ ते रात्री १० पर्यंत असेल. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ दि. २३ जानेवारी २०२० रोजी सायंकाळी ७.३० वाजता ठाणे महापालिका खुले कलादालन, अष्टविनायक चौक, मिठ बंदर रोड, ठाणे पूर्व येथे आयोजित करण्यात येईल.

No comments