web-ads-yml-750x100

Breaking News

बँगलोरच्या कराटे स्पर्धेत मुरबाडचे कराटेपट्टु विजय ; मुरबाडचा विजयी झेंडा बँगलोर मध्ये फडकवला ; विजयाच्या शिल्पकाराचे मार्गदर्शक कराटे मास्टर वसंत जमदरे

BY - कुणाल शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड |
वर्ल्ड फुनाकोशी शटकोन कराटे ऑर्गनाइजेशन आयोजित नॅशनल कराटे चॅम्पीयनशीप साऊथ इंडिया कप स्पर्धा बँगलोर येथे घेण्यात आली होती.संपुर्ण राज्यातून 600 ते 700 कराटेपट्टूंनी सहभाग नोंदविला होता.त्यामध्ये महाराष्ट्राच्या ठाणे जिल्हयाच्या मुरबाड सारख्या ग्रामीण भागातून कराटे मास्टर वसंत जमदरे यांचे शिष्य मधूकर गायकर यांनी व अन्य दोघ कराटेपट्टूंनी भाग घेतला होता.कराटे ब्लॅकबेल्ट मास्टर म्हणून मधूकर गायकर सर यांची ओळख असून त्यांच्या यशाची गुरूकिल्ली मास्टर वसंत जमदरे असल्याचे त्यांनी मागील मुलाखतीत सांगितलेच होते.
अशा वर्ल्ड फेमस असणारे कराटे मास्टर वसंत जमदरे यांच्या मार्गदर्शनाने आणि दिलेल्या शिकवणीने मधूकर गायकर सरांनी मुरबाडसारख्या ग्रामीण भागाचा नाव बाहेरील राज्यात विजय संपादन करित मुरबाड झेंडा फडकवला.या कराटे स्पर्धेत जमदरे सरांचे 3 शिष्य सामील झाले अन विजयाची सलामी अखेर देऊनच परतले.कधीच अपयश आले नाही असे मधूकर गायकर सरांनी बँगलोर स्पर्धेत गोल्डमेडल मारून मुरबाडचे नावलौकिक केले आहे.तर हर्ष लाटे,केतन तिवरे या दोघांनी गोल्ड व सिल्व्हर मेडल मारून विजय पटकावला आहे.त्यांच्या विजयाने संपुर्ण ठाणे जिल्हयात व मुरबाड तालुक्यात अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे.


No comments