0
BY - गौरव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
कर्तव्य सोशल ग्रुप आणि फाबीयानी व बुधराणी हार्ट इन्स्टिट्यूट पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने बाल ह्रदयरोग निवारण शिबीर घेण्यात आले,या शिबीरात लहान मुलांच्या ह्रदयाची टुडी इको (सोनोग्राफी) तपासणी मोफत केली बालकांच्या हृदयासंबंधी आजाराचे निदान करुन योग्य उपचारासाठी मार्गदर्शन केले गेले.
आजच्या शिबिरामध्ये ६० पेक्षा अधिक रुग्णांची तपासणी केली आणि पुढील उपचारासाठी २५ रूग्णांची निवड करण्यात आली.या कर्यक्रमास श्रीमंत छत्रपती सौ.वेदांतिकाराजे भोसले.व फाबीयानी व बुधराणी हार्ट इन्स्टिट्यूट पुणे यांचे तज्ञ डॉक्टर व इतर मान्यवर उपस्थित होते.

Post a comment

 
Top