Breaking News

खाद्यपदार्थाचे दर कमी करा अन्यथा आंदोलनास सामोरे जा राष्ट्रवादी युवकचा कोलंबिया एशिया हाॅस्पिटलला इशारा...

BY - नितिन पुंडे,युवा महाराष्ट्र लाइव – पुणे |
कोलंबिया एशिया हॉस्पिटल मधील रुग्णांना दिल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थाचे अवाजवी दर हे रुग्णांना नातेवाईकांना परवडण्यासारखे नाहीत... अशाप्रकारे नागरिकांकडून अनेक तक्रारी येत होत्या... प्रत्यक्ष पाहणी केली असता यातून नागरिकांची रुग्णांची व त्यांच्या नातेवाईकांची आर्थिक पिळवणूक होत असल्याचे आढळून आले... 
याच्या विरोधात आज राष्ट्रवादी युवक कांग्रेस तर्फे पत्र देण्यात आले... नगरसेवक महेंद्र पठारे, नगरसेवक भैय्यासाहेब जाधव, राष्ट्रवादी युवक अध्यक्ष किरण खैरे, उपाध्यक्ष सुहास तळेकर, वडगाव शेरी विधानसभा उपाध्यक्ष सोमनाथ साबळे, कुलदिप शर्मा, गणेश कांबळे (सामाजिक न्याय), भाऊसाहेब जाधव, स्वप्निल पठारे, आकाश कांबळे, सोशल मीडिया सेलचे अध्यक्ष सागर धाराशिवकर यांच्या उपस्थितीत दिलेल्या पत्राच्या विनंतीवरून हे दर बाजार मूल्य प्रमाणे घ्यावेत.. नागरिकांची आर्थिक पिळवणूक थांबावी अशी विनंती करण्यात आली आहे.... जर दहा दिवसांच्या आत मध्ये जर खाद्यपदार्थ दरपत्रक बदलण्यात आले नाहीत... रुग्णांच्या नातेवाईकांना नागरिकांना बाजारमूल्य प्रमाणे खाद्यपदार्थ दिले गेले नाहीत.... तर राष्ट्रवादी युवक काँग्रेस व राष्ट्रवादी वडगाव शेरी विधानसभा मतदार संघ व प्रभाग क्रमांक चार तर्फे लोकशाही व कायदेशीर रित्या आंदोलन करण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी युवक वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष किरण खैरे यांनी दिला आहे.

No comments