web-ads-yml-750x100

Breaking News

गॅस पेटवणं सोपं असते मात्र गोरगरीबाच्या घरातील चूल आधी पेटायला हवी;मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना टोला लगावला

BY – युवा महाराष्ट्र लाइव – औरंगाबाद |
राज्यातील गोरगरीब जनेतेच्या अनेक दैनंदीन समस्या आहेत. गॅस पेटवणं सोपं असते मात्र गोरगरीबाच्या घरातील चूल आधी पेटायला हवी, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना टोला लगावला आहे. औरंगाबादमध्ये महाएक्स्पो 'अॅडव्हान्टेज महाराष्ट्र एक्स्पो-2020' चे उदघाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना ठाकरे म्हणाले की, 'आपल्या उद्योजकांमध्ये बळ आहे. देशाचे लक्ष वेधेल असा हा एक्स्पो आहे. अनेक संकटावर मात करून हे सरकार उभं केलं आहे. हे सरकार उद्योजकांना खंबीर करणार असून येत्या काळात आंतरराष्ट्रीय एक्स्पो करण्यासाठी प्रयत्न करेल.' असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. पुढे ते म्हणाले की, 'देशात, जगात, देशात आर्थिक मंदी आहे म्हणून रडत बसलो तर आपण लढू शकणार नाही. रडणारे तसं नीट जगूही शकणार नाही. लढतो तो जगतो. महाराष्ट्राला लढण्याची परंपरा आहे' असे म्हणत त्यांनी उद्योजकांना बळ दिले.

No comments