0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
मुख्यमंत्री सहायता निधीसाठी अँपासेट स्पेशालिटी प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या वतीने २५ लाख रुपयांचा धनादेश आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपुर्द करण्यात आला. हा धनादेश मुख्यमंत्री कार्यालयाकडे  देण्यात आला आहे.
अँपासेट कंपनीच्या सीएसआर  फंडातून हा निधी मुख्यमंत्री सहायता निधीस देण्यात आला आहे. यावेळी पारनेरचे आमदार निलेश लंके, कंपनीचे अधिकारी संतोष चौधरी, तुषार लबडे, राजेंद्र चौधरी, संतोष मोढवे, कांतीलाल भोसले आदी उपस्थित होते.

Post a comment

 
Top