0
BY – युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
रयत शिक्षण संस्थेमार्फत पारंपरिक शिक्षण पद्धतीबरोबर कौशल्य आधारित शिक्षण दिले जाते. राज्यात या संस्थेची अनेक महाविद्यालये आहेत. संस्थेचे राज्यस्तरीय समूह विद्यापीठ (क्लस्टर युनिव्हर्सिटी) व्हावे, अशी अनेक दिवसांपासूनची मागणी आहे. त्याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर करावा, असे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी येथे दिले.यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे खासदार शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत रयत शिक्षण संस्थेच्या विविध मागण्यांसंदर्भात बैठक घेण्यात आली. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, आमदार सतीश चव्हाण उपस्थित होते.मंत्री श्री. सामंत म्हणाले, समूह विद्यापीठासाठी लागणारा निधी देण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल. राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान (रुसा) अंतर्गत 33 कोटी रुपये केंद्र शासन आणि 22 कोटी रुपये राज्य शासन असा एकूण 55 कोटी रुपयांचा प्रस्ताव असून तो मंत्रिमंडळासमोर मांडण्यात येईल.रयत शिक्षण संस्थेत पारंपरिक शिक्षणाबरोबरच 30 हजार विद्यार्थ्यांना कौशल्य आधारित शिक्षण दिले जाते. यासाठी पदभरती करणे आवश्यक आहे. या पदभरती प्रक्रियेला तत्वत: मान्यता देण्यात आली असल्याचे श्री.सामंत यांनी सांगितले.यावेळी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, संचालक धनराज माने, रयत शिक्षण संस्थेचे सचिव डॉ.भाऊसाहेब कराळे उपस्थित होते.

Post a comment

 
Top