0
BY - युवा महाराष्ट्र लाइव - मुंबई |

येथील नागपाडा परिसरातील चिनॉय इमारतीला भीषण आग लागली आहे. या आगीत पाच जण जखमी झाल्याची माहिती आहे. यामधील काही जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आली आहे.सुदैवाने कोणतीही जीवितहानी यामध्ये झालेली नाही. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी जवानांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.पाच जण जखमी आहेत. त्यांना नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आदिल कुरेशी (20), निशा देवी(32), चंदादेवी (60), अनिया आगे(2 वर्षे), मोहरम (70) अशी जखमींची नावे. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे  प्रयत्न सुरू आहे.

Post a comment

 
Top