web-ads-yml-750x100

Breaking News

सुनिल सकट यांना स्वामी विवेकानंद ज्ञान गौरव पुरस्कार प्रदान

BY – युवा महाराष्ट्र लाइव – अहमदनगर |
निमगांव वाघा ता.जि.अ.नगर येथे "स्व.पै.किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्थेच्या" वतीने राजमाता जिजाऊ व महाविद्वान स्वामी विवेकानंद त्यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. त्यांच्या पवीत्र  स्मृतीस पुष्पहार अर्पण करुन जयघोष करण्यात आला. विवीध भागातुन सामाजीक कार्यकर्ते तथा तरुण वर्ग ग्रामस्त व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थीत राहुन त्यांनी भाषणे व पोवाडे सादर केले.राजमाता माँसाहेब जिजाऊ व विवेकानंद स्वामींच्या महान कार्याचा तथा इतीहासाचा तेजोमय उजाळा दिला. त्या निमीत्ताने विवीध क्षेत्रात उल्लेखणीय कार्य करणा-या व्यक्तींना विवीध पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले त्या प्रसंगी अहमदनगरचे भुमिपुत्र समाजसेवक तथा "लहुजी शक्ती सेनेचे" जिल्हा कार्याध्यक्ष सुनिल सकट यांना जिल्हा परीषद सदस्य माधवराव लामखडे पाटील,संस्थेचे अध्यक्ष पै. नानासाहेब डोंगरे पाटील यांच्या शुभ हस्ते "राज्यस्तरीय स्वामी विवेकानंद ज्ञान गौरव पुरस्काराने" सन्मानित करण्यात आले.त्या समयी प्रमुख पाहुणे माजी सरपंच साहेबराव बोडखे,क्रीडाधीकारी    नंदकुमार रासने, साहेबराव काते, सचीव मंदाताई डोंगरे,छाया मुन्ने, बाळु पवार,अतुल फलके,आण्णा जाधव,शिवशाहीर विक्रम अवचिते, प्रतीभा डोंगरे ई. उपस्थीत होते. सुनिल सकट यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.


No comments