Breaking News

मुख्यमंत्र्यांकडे समस्या घेऊन आलेल्या शेतकरी बापलेकीला 'मातोश्री’बाहेर पोलिसांकडून धक्काबुक्की

BY - युवा महाराष्ट्र लाइव - मुंबई  |
मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी आलेल्या शेतकरी पिता-पुत्रीला पोलिसांनी धक्काबुक्की केल्याची घटना घडली आहे. सात ते आठ वर्षाच्या मुलींबरोबर ही पोलिसांना ढकलाढकली केली आहे. पिता-पुत्रीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पनवेल येथील देशमुख हे शेतकरी असून आपल्या शेताच्या लोन संदर्भात झालेला गैरप्रकार सांगण्यासाठी मातोश्रीवर आले होते. मातोश्रीमध्ये जाण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी त्यांना ढकलाढकली केली.
पनवेल येथील देशमुख हे शेतकरी असून आपल्या शेती कर्जासंदर्भात झालेला गैरप्रकार सांगण्यासाठी ते रविवारी 'मातोश्री'वर आले होते. मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी देशमुख यांनी 'मातोश्री'त प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचे म्हणणे ऐकून न घेता पोलिसांनी त्यांच्याशी अरेरावी केल्याची माहिती समोर आली आहे. तथापी, मातोश्रीवर आलेल्या त्या शेतकऱ्याला पोलिसांना सोडण्यास सांगितले आहे , तसेच त्याचे काय काम आहे याबाबत विचारपूस करण्यास सांगितले आहे.

No comments