0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
राज्यात गेल्या काही दिवसांपासून सर्वात कमी तापमान चंद्रपूरात होते. आता चंद्रपुरकरांना बुधवारी थोडा दिलासा मिळाला आहे. दरम्यान मुंबईच्या तापमानात आणखी घट झाली आहे. येथील तापमान आता 15 अंश सेल्सियस एवढी नोंद करण्यात आली. तर नाशिकमध्ये सर्वात कमी 10.3 अंश सेल्सियस एवढे तापमान होते. पुढील दोन दिवसांमध्ये मुंबईच्या तापमानामध्ये आणखीनच घट होण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.दरम्यान विदर्भात पावसाने हजेरी लावली आहे. येत्या काही दिवसात अजून पाऊस पडण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. सन 2019 चा डिसेंबर महिना अन्य वर्षांतील डिसेंबर महिन्याच्या थोडा उष्ण होता. मात्र वर्षाच्या शेवटच्या दिवशी मुंबईच्या तापमानात घट झाली. 16.4 अंश सेल्सियस एवढी नोंद करण्यात आली. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी मुंबईकरांना गुलाबी थंडीचा अनुभव घेता आला होता. सकाळचे तापमान 15 अंश सेल्सियसपर्यंत खाली आले होते. दरम्यान विदर्भामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाने हजेरी लावली होती. कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात हवामान कोरडे होते.आज गुरुवारी विदर्भामध्ये काही ठिकाणी, तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकण-गोवा व मध्य महाराष्ट्रात हवामान कोरडे राहणार आहे. तर नाशिकमध्ये सध्या सर्वात कमी तापमान आहे.

Post a Comment

 
Top