web-ads-yml-750x100

Breaking News

रुग्णांच्या उपचारांची सर्वतोपरी दक्षता घेण्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांचे निर्देश

BY – युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
शासकीय रुग्णालयात दाखल झालेल्या कोणत्याही रुग्णाच्या उपचारांमध्ये गैरसोय होणार नाही याची सर्वतोपरी दक्षता घ्यावी. तसेच रुग्णांसाठी असलेल्या सर्व सोयीसुविधांचा लाभ रुग्णास मिळावा, अशा सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिल्या.
वैद्यकीय शिक्षण विभाग आयुर्वेदिक शिक्षण तसेच हाफकीन संस्थेची आढावा बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे झाली. या बैठकीस वैद्यकीय शिक्षण प्रधान सचिव डॉ.संजय मुखर्जी, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ.तात्याराव लहाने, हाफकीनचे संचालक राजेश देशमुख व निशिगंधा नाईक व इतर अधिकारी उपस्थित होते.विभागांच्या सादरीकरणानंतर कार्यपद्धतीसंदर्भात मार्गदर्शन करताना श्री.देशमुख यांनी प्रामुख्याने नवजात शिशूंच्या संदर्भात अतिदक्ष राहण्यास सांगितले. राज्यातील नवजात शिशूंना जगविण्यासाठी मोठ्या प्रमाणात दक्षता घ्या. त्यांच्या मृत्यूचे प्रमाण कमी झाले पाहिजे, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करा. राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालये व संलग्न रुग्णालये या ठिकाणी असलेल्या सोयीसुविधा यांचा जास्तीत जास्त उपयोग रुग्णांसाठी करण्यात यावा. औषधे व उपचार यंत्रणाही रुग्णांच्या सेवेसाठी अतिशय महत्त्वाची असते. याची कमतरता भासू नये त्याबतही काळजी घ्यावी. उपचार यंत्रणा नादुरुस्त होणार नाही हे पाहावे. या सेवांकरिता आवश्यक असलेला निधी कमी पडू दिला जाणार नाही. मात्र रुग्णांवर योग्य उपचार हे झालेच पाहिजेत, असे निर्देश श्री.देशमुख यांनी दिले.

No comments