0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – नवी दिल्ली |
अमेरिकेने आपल्या विमान कंपन्यांसाठी एडवाईजरी जारी केली आहे. अमेरिकेने कंपन्यांना पाकिस्तानच्या हवाई क्षेत्राचा वापर करण्यास टाळायला सांगितले आहे. पाकिस्तानमधील अमेरिकन विमानांवर दहशतवादी हल्ला होऊ शकतो, असे या एडवाईजरीत म्हटले आहे. अमेरिकन फेडरल एव्हिएशन अ‍ॅडमिनिस्ट्रेशन (एफएए) यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, हे विमान पाकिस्तानी दहशतवादी गटांचे लक्ष्य असू शकते. दोन दिवसांपूर्वी इराकची राजधानी बगदादमधील दोन अमेरिकन दूतावासावर दोन आंदोलकांनी हल्ला केला तेव्हा ही एडवाईजरी देण्यात आली आहे.

Post a comment

 
Top