Breaking News

पश्चिम विदर्भात ढासळतोय भाजपाचा गढ;बुलढाणा अकोला वाशिम जिल्हा परिषदेत भाजपा झालीय सत्ते पासून दुर

BY – संदीप शुक्ला,युवा महाराष्ट्र लाइव – बुलढाणा  |
शत प्रतिशत भाजपा चा नारा देत भाजपा चा वेगवान पळणारा अश्व  पश्चिम विदर्भात महाविकास आघाडी आणि वंचित ने अडवला आहे बुलढाणा अकोला वाशिम जिल्हा परिषदेत भाजपा ची स्पेशल पीछेहाट करीत भाजपा च्या या गडात मोठे हादरे बसले आहे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपा ला मिळालेले अभूतपूर्व यश आणि वंचित पेटर्न चे अपयश आणि कांग्रेस राष्ट्रवादीची पीछेहाट या मुळे संपूर्ण चित्र भाजपामय झाले असताना जिल्हापरिषद निवडणुकीत भाजपा ला लागलेले धक्के या मुळे भाजपा वर प्रश्न चिन्ह निर्माण झाले असून बदलेल्या राजकीय परिक्षेप्रात भाजपाची अभूतपूर्व कोंडी झाल्याचे चित्र आहे अकोला वाशिम आणि बुलढाणा मध्ये भाजपाला सत्तेबाहेर ठेवण्यात विरोधक यशस्वी ठरलेत
अकोला जिल्ह्यात लोकसभा विधानसभेत अयशस्वी ठरलेला बाळासाहेब आंबेडकर यांचा पक्ष वंचित बहुजन आघाडी जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येऊन सत्तेच्या जवळ पोचला आहे  आहे वाशिम मध्ये राष्ट्रवादी ने मुसंडी मारत बाजी मिळवली आहे येथे भाजपाला केवळ सात जागाच राखता आल्यात तर बुलढाणा येथे झालेल्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने भाजपा ला सत्तेपासून दूरच ठेवले पश्चिम विदर्भातील अकोला बुलढाणा वाशिम या महत्वाच्या पट्यात मिनी मंत्रालय असलेला ग्रामीण भागाची सत्ता भाजपा गमावून बसला आहे आणि भाजपासाठी ही धोक्याची घंटा निश्चितच आहे
अकोला जिल्हा हा भाजपा चा परंपरागत गढ आहे अगदी जनसंघाचे काळापासून भाजपाचाच वट इथे चालला लोकसभेत भरघोस यश मिळवून विधानसभेत पाच पैकी चार जागा भाजपाने जिंकल्यात जिल्हा परिषदेत देखील याच विजयी थाटात मिशन 35 भाजपाने हाथी घेतले माजी मुख्यमंत्री पासून अनेकांनी निवडणूक प्रतिष्ठची बनवली मात्र बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रवाहापुढे भाजपा गलितगात्र झाली गेल्यावेळी जिंकलेल्या 11 जागाही भाजपा गमावून बसली जिल्ह्यात भाजपाची दाणादाण उडाली अवघ्या 7 जागांवर भाजपा येऊन ठेपली तर दुसरी कडे लोकसभा आणि विधानसभेत अस्ताला गेलेला वंचित पेटर्न अकोल्याच्या ग्रामीण भागातून पुन्हा उदयास आला आहे अकोल्यात शिवसेनेनेही 13 जागा मिळवल्या तर कांग्रेस राष्ट्रवादी ला सात जागा मिळाले वाशिम जिल्हा परिषदेत देखील भाजपाला फारसे काही करता आले नाही इथे भाजपा चे तीन पैकी दोन आमदार असताना राष्ट्रवादीने जोरदार मुसंडी मारत भाजपा ला चारे खाने चित केले राष्ट्रवादीने 12 जागेवर मुसंडी मारली भाजपाला सात जागांवर समाधान मानावे लागले तर कांग्रेस ला 9 आणि शिवसेनेला 6 जागा मिळाल्यात इथे  महाविकास आघाडीचा झेंडा लागणार हे नक्की तर बुलढाणा जिल्हा परिषदेत सार्वत्रिक निवडणूक नसली तरी अध्यक्ष पदाची टर्म संपल्याने अध्यक्ष उपाध्यक्ष आणि विषय समित्यांची निवडणूक होऊ घातली होती या निवडणुकीत भाजपाकडे सर्वाधिक23 जागा असतानाही महाविकास आघाडीने एकत्र येत भाजपा ला सत्तेबाहेर ठेवले 2017 मध्ये भाजपा ने  जिल्हा परिषदेची स्थापना झाल्या पासून प्रथमच  जिल्हापरिषदेवर सत्ता मिळवली होती सर्वाधिक जागा जिंकल्या होत्या त्यावेळी शिवसेनेशी मतभेद वाढल्याने राष्ट्रवादी सोबत सत्ता स्थापन केली होती मात्र आता कांग्रेस शिवसेना राष्ट्रवादी एकत्र येत भाजपा चा सत्ता रथ रोखला गेला. पश्चिम विदर्भात वर्हाड प्रांतात भाजपा ची स्थिती अभिमन्यू सारखी झाली जी विरोधकाच्या चक्रव्यूहात अडकली आहे चोहोबाजूने घेरली आहे शिवसेनेने भाजपासोबत परतीचे दोर कापल्याने आता खऱ्या रूपाने भाजपाचे सत्तेचे दोर कापले जात आहेत पश्चिम वऱ्हाड प्रांतात तरी हीच स्थिती आहे भाजपाचे बालेकिल्ले ढासळत आहेत आणि भाजपा एकाकी पडू लागली आहे स्वतः ला सर्वात मोठा जागतिक पक्ष म्हणवणार्या भाजपा साठी ही धोक्याची घंटाच म्हणावी लागेल तर शिवसेना फायद्यात तर आहेच अनेक ठिकाणी ती महाविकास आघाडीच्या मदतीने सत्तेत आली आहे तर गलितगात्र झालेल्या कांग्रेस आणि राष्ट्रवादीत तर जणू नवीन प्राणच संचारला आहे ही वेगळी राजकीय स्थिती निर्माण झाली आहे

No comments