web-ads-yml-750x100

Breaking News

घाटकोपरला अण्णाभाऊ साठे, परळला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे राष्ट्रीय स्मारक उभारणार - गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड

BY - मन्साराम वर्मा ,युवा महाराष्ट्र लाइव - मुंबई |

मुंबईतील चिराग नगर-घाटकोपर येथे अण्णाभाऊ साठे यांचे वास्तव्य असणारे घर व बीआयटी चाळ-परळ येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य असणाऱ्या घराच्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या गृहनिर्माण विभागामार्फत राष्ट्रीय दर्जाची स्मारके उभारण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली. वांद्रे पूर्व येथील महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) गृहनिर्माण भवन या मुख्यालयात आज आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी म्हाडामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध प्रकल्पांची माहिती आव्हाड यांनी घेतली. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना आव्हाड यांनी ही माहिती दिली.

No comments