BY -
मन्साराम वर्मा ,युवा महाराष्ट्र लाइव - मुंबई |
मुंबई- पुणे- मुंबई
एक्सप्रेस वेवर शनिवारी जेष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांचा अपघात झाला होता.
यामध्ये त्या गंभीररित्या जखमी झाल्या होत्या. अपघातानंतर त्यांच्यावर नवी
मुंबईतील कामोठे येथील महात्मा गांधी मिशन मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलमध्ये
हलवण्यात आले. यानंतर त्यांना मध्यरात्री अंधेरीतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी
रुग्णालयात दाखल करण्यात आले.आता शबाना आझमी यांच्या वैद्यकीय तपासणीचा अहवाल समोर
आला आहे. केडीएएचमध्ये वैद्यकीय तपासणीनंतर एक्झीक्यूटीव्ह डायरेक्टर आणि सीईओ
यांनी शबाना यांची तब्येतीत सुधारणा असल्याचे सांगितले आहे. तसेच सध्या त्या
डॉक्टरांच्या देखरेखीखाली असल्याचं सांगण्यात आलं आहे. यापूर्वी शबाना यांना
एमजीएम रुग्णालयात भरती करण्यात आले होते.
Post a comment