web-ads-yml-750x100

Breaking News

कडधान्य, डाळींच्या किंमतीत वाढ

BY – युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
महंगाई डायन खाए जात है असे म्हणण्याची वेळ आता गृहिणींवर आली आहे. महागाईने प्रचंड वाढली आहे. एकतर यावर्षी पावसामुळे अन्नधान्याच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे बाजरात मालाचा तुटवडा जाणवण्याची शक्यता आहे. यामुळे डाळींच्या किंमती प्रचंड महागणार आहे. याचा परिणाम सध्या बाजारात दिसून येतोय. दिवाळीनंतर बाजारात नवीन अन्नधान्याची आवक सुरू होत असते. मात्र यावेळी थोड्या उशिराने ही आवक सुरू झाली. डाळींच्या दरात गेल्या वर्षीच्या मानाने 30 ते 40 टक्क्यांची वाढ झाली आहे.
अनेक कडधान्य घाऊक बाजारात शंभर रुपये किलोच्या घरात पोहोचले आहेत. याचा परिणाम म्हणजे सर्वसामान्य ग्राहकांच्या खिळाला झळ बसत आहे. किरकोळ बाजारामध्येही कडधान्य 100 ते 120 रुपये किलोच्या घरात पोहोचले आहे. यापूर्वीच गेल्या आठ महिन्यांपासून कांदा, भाजीपाला यांच्या वाढलेल्या दराने त्रस्त झालेल्यांना आता या कडधान्याच्या वाढत्या दराचा सामना करावा लागणार आहे.

No comments