web-ads-yml-750x100

Breaking News

मनपाच्या साईबाबा शाळेचा भव्य दिव्य क्रीडा महोत्सव संपन्न ...!

BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
मनपाच्या साईबाबा पथ शाळेचा भव्य क्रीडा महोत्सव नुकताच शाळेच्या मैदानावर संपन्न झाला. महोत्सवाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे म्हणून श्री सुनील मिश्रा व श्रीमती मिश्रा डेप्युटी कमांडंर सी.आय.एस.एफ. आणि आय.जी.मिंत युनिट सी.आय.एस. एफ. यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी मुलांना मैदानी खेळाचे महत्त्व पटवून दिले. गौरव शुक्ला यांनी शपथ ग्रहण करून मशाल पेटवून महोत्सवाची सुरवात केली. श्रद्धा गायकवाड आणि रानीता घोष यांनी सूत्रसंचालनची जबाबदारी सांभाळली.

या क्रीडा महोत्सवात विविध स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या होत्या. ऍथलेटिक, बटाटा स्पर्धा, चमचा लिंबू , बुक बॅलन्स , सुई धागा , बिस्किट्स वाईट, अडथळा शर्यत , इत्यादी विविध विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच कबड्डी , फुटबॉल, बुद्धिबळ , टेबल टेनिस इत्यादी विविध स्पर्धा घेण्यात आल्या .
या स्पर्धेचे यशस्वी करण्यासाठी शाळेचे क्रीडा प्रशिक्षक श्री योगेश साळवी सर यांनी खूप मेहनत घेतली व स्पर्धेचे यशस्वी आयोजन केले. शाळेचे मुख्याध्यापक गजभिये सर मुख्याध्यापिका श्रीमती मांजरेकर मॅडम तसेच शाळा व्यवस्थापन समिती, ट्रस्टी मीनल श्रीनिवासन मॅडम , विशाल सर, शिक्षकेतर कर्मचारी, पालक , फुटबॉल कोच चौहान सर यानी खूप मेहनत घेतली.व परिश्रम घेऊन स्पर्धा यशस्वीपणे संपन्न केली.

No comments