0
BY - कुणाल शेलार ,युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड |
आदिवासी युवा संघटना महाराष्ट्र राज्य मुरबाड तालुका आयोजित उद्दया दि.25/01/2020 रोजी सकाळी 9 वाजता  बनाचीवाडी,वैशाखरे,ता.मुरबाड येथे आदिवासी संस्कृति संवर्धन महामेळावा आयोजित  केला आहे. '' एक तिर एक कमान,सारे आदिवासी एक समान '' अशा ब्रिद वाक्यातून आज आदिवासी बांधव एकत्र येऊन समाजातील प्रत्येक घटकांतील नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी येत असतात.अशा आदिवासी बांधवांना समाजात सन्मान मिळाला असून न्याय हक्काच्या लढार्इत त्यांच्या कार्याची प्रशंसा हि प्रशासकीय कार्यालयात नोंद म्हणून आपणास पाहावयास मिळत आहे.अनेक थोर क्रांतिकारकांच्या प्रेरणेने भारतातील संस्कृति ही जपली जात आहे त्यातील आदिवासी बांधवांची जल्लोषातील कलेचा,परंपरचे सन्मान करत यंदाच्या वर्षीही या आदिवासी संस्कृति संवर्धन महामेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे.या महामेळाव्यात 17 गावांचा समावेश असणार आहे.यामध्ये गौरी नाच,कामडी नाच अशा अन्य सांस्कृतिक कार्यक्रम कलागुणांनी संपन्न होणार आहे.या महामेळाव्याला अनेक मान्यवरांची उपस्थिती राहणार असल्याचे आदिवासी संस्कृति संवर्धनाच्या पदाधिकार्‍यांनी आमच्याशी बोलतांना सांगितले आहे.

Post a comment

 
Top