BY – युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
युरोपमधील बुडापेस्ट (हंगेरी) येथे नुकत्याच 'बुडापेस्ट सर्कस
फेस्टिवल २०२०' चे आयोजन करण्यात आले. यावर्षी भारताने पहिल्यांदाच यात सहभाग घेतला.
सांताक्रुझ येथील साने गुरूजी आरोग्य मंदिर
या संस्थेतील क्रिडापटूंनी या फेस्टिव्हलमध्ये मल्लखांबाचे सादरीकरण करून भारताला
तिसरा क्रमांक मिळवून दिला. त्याबद्दल क्रीडा
व युवक कल्याण राज्यमंत्री कुमारी आदिती तटकरे
यांनी त्यांचे अभिनंदन केले.
फोव्हरस्की नायासिक्रुझ
चे दिग्दर्शक पीटर फेकेटी यांनी या फेस्टिव्हलचे
आयोजन केले होते. यात २३ देशांमधून अनेक सर्कस
कलाकार सहभागी झाले होते. अनेक कलाकारांनी यात सादरीकरण केले. यामध्ये प्रथम क्रमांक
आलिस शेहटर ( इस्राईल), द्वितीय क्रमांक हुओ युनिटी (पॅरिस) यांना मिळाला. त्यांनी
व्हिलवर प्रात्यक्षिक सादर केले होते. तर सांताक्रुझ येथील साने गुरूजी आरोग्य मंदिर या संस्थेच्या ५ क्रिडापटूंनी मल्लखांबाचे सादरीकरण
करून भारताला आंतरराष्ट्रीय पातळीवर तृतीय क्रमांक मिळवून दिला. असेही राज्यमंत्री
कुमारी तटकरे यांनी सांगितले.
Post a comment