Breaking News

भारत-नेपाळ सीमेवर हाय अलर्ट;उत्तर प्रदेशात घुसले दोन दहशतवादी

BY - युवा महाराष्ट्र लाइव - नवी दिल्ली  |
उत्तर प्रदेशात दोन दहशतवादी घुसल्याची माहिती समोर आली आहे. दहशतवादी नेपाळमध्ये पळून जाण्याची शक्यता आहे. सिद्धार्थनगर जिल्ह्यातील भारत-नेपाळ सीमेवर हाय अलर्ट जारी करण्यात आल्याची माहिती आयजी आशुतोष कुमार यांनी दिली. तसेच ते म्हणाले की, गुप्तचर यंत्रणेला मिळालेल्या माहितीनुसार, अब्दुल समद व इलियास हे दोन पाहिजे असलेले दहशतवादी उत्तर प्रदेशात घुसले असून ते नेपाळच्या सीमेवरून पळून जाऊ शकतात. त्यामुळे भारत -नेपाळ सीमेवरील सिद्धार्थनगर जिल्ह्यात हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे.

No comments