0
BY – युवा महाराष्ट्र लाइव – रायगड |
मुंबई-गोवा महामार्गावर बसचा भीषण अपघात झाला आहे. एस टी बस पुलावरुन कोसळली. माणगाव नजीक कळमजे पुलावर पहाटे 5.30 वाजताची ही दुर्घटना घडली. बसमध्ये एकूण 44 प्रवासी होते. अपघातात 20 प्रवासी जखमी झाल्याचे वृत्त आहे. यामध्ये 2 गंभीर जखमी आहेत. मुंबईहून दापोलीकडे बस निघाली असतानाच हा अपघात झाला. जखमींना माणगाव रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

Post a comment

 
Top