0
BY - नामदेव शेलार ,युवा महाराष्ट्र लाइव – उल्हासनगर |
मध्यवर्ती रूग्णालय उल्हासनगर 03 सेंट्रल येथे हजारो नागरिक उपचार घेण्यासाठी येत असतात.अशा वेळी नागरिकांना गैरसोय निर्माण झाल्यास त्याची माहिती कळताच हातातील काम बाजुला सारून त्या गोरगरिबांच्या मदतीला धावून जाणारे डॉ.सुधाकर शिंदे यांच्या कार्याची प्रशंसा नागरिक करित आहे.

            डॉ.सुधाकर शिंदे यांनी उल्हासनगर सेंट्रल हॉस्पिटलचे पदभार स्विकारण्याआधी अन्य तालुक्यात त्यांच्या कार्याबद्दल वाव आहे.त्यांचे योगदान  डॉक्टर असल्याने  नव्हे तर माणूसकी जपणारी पाहण्यास मिळत आहे.हॉस्पीटल हे आपले कुटूंब तर या कुटूंबात  उपचार घेण्यासाठी आलेला प्रत्येक व्यक्ती हा कुटूंबातील सदस्य आहे अशी धारणा मनात बाळगून निस्वार्थीपणे डॉक्टरकीच्या भुमिकेतून  समाजसेवा करणारे डॉ.सुधाकर शिंदे यांच्या कार्याची प्रशंसा संपूर्ण जिल्हयात होत आहे.या धरतीवर डॉक्टर हा देवाचा  रूप माणले जाते अशावेळी सुधाकर शिंदे जेव्हा डॉक्टर म्हणून  लाभतात तेव्हा  खर्‍या रूपात देवाचा साक्षातकार होते हेही  तितकेच सत्य आहे.अपेक्षेचा व्यक्ती सर्वकाळ माणसाच्या हृदयात नाही राहत असे म्हणतात परंतू निस्वार्थी सेवा करणारा हा मरणोत्तर मनात आपले घर करून बसतो हे निदर्शनास आले उल्हासनगर येथिल मध्यवर्ती रूग्णालयातील डॉ.सुधाकर शिंदे यांच्या कार्यातून. डॉ.सुधाकर शिंदे यांची शिस्त कडक परंतू माणूसकीला सांभाळणारी आणि दुखःच्या वेळी गोरगरिबांना मदतीचा हात देणारी आहे.भविष्यात काय होर्इल याचा विचार नाही तर आत्ता जे कार्य डॉक्टरीच्या माध्यमातून ध्येय,निष्ठ मनात बाळगुन करता येर्इल व याचा फायदा गोरगरिबांच्या सेवेसी होर्इल याचीच मनोधारणा सदैव मनात आहे,कायमस्वरूपी राहील असे डॉ.सुधाकर शिंदे यांनी आमच्याशी बोलतांना सांगितले आहे.

Post a comment

 
Top