Breaking News

" फरफट " या मराठी सिनेमाचा मुहूर्त कोल्हापूर येथे दणक्यात संपन्न ..!

BY - युवा महाराष्ट्र लाइव - मुंबई  |
तेजस मेघा फिल्म्स प्रॉडक्शन प्रस्तुत " फरफट " या मराठी सिनेमाचा मुहूर्त नुकताच कोल्हापूर येथील ताराराणी चौक,  " रजत हॉटेल " या ठिकाणी अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. निर्मात्या मेघा डोळस यांनी चित्रपट संहितेचे पूजन केले तर प्रसिद्ध गायक भारत चव्हाण यांनी नारळ वाढविला तर मंदार रेळेकर यांनी क्लैप दिला.तर कवयित्री कुमुदिनी मधाळ उपस्थित होत्या.
  " फरफट " या सिनेमाची कथा -पटकथा -संवाद लेखन मेघा डोळस यांचे असून 
सिनेमाच्या दिग्दर्शनाची सर्वतोपरी जबाबदारी महेश्वर तेटांबे यांनी स्वीकारली आहे आणि ते नक्की या सिनेमाला न्याय देतील असा विश्वास सिनेमाच्या निर्मात्या मेघा डोळस यांनी दिला आहे. तसेच
संगीतकार सुनिल म्हात्रे यांनी नवोदित गीतकार विशाल आडबाल यांच्या गीतांना स्वरबद्ध केलं असून छायाचित्रण आणि संकलन ह्या जमेच्या दोनही बाजू त्यांनी सांभाळल्या आहेत तर प्रमुख सहाय्यक दिग्दर्शक म्हणुन मंदार रेळेकर यांनी जबाबदारी स्वीकारली आहे. थोडक्यात काय तर ..
मध्यमवर्गीय गरीब कुटुंबातील वडिलांचे छत्र हरविलेल्या मंदबुद्धी मुलाचा प्रगतीच्या दृष्टीने सर्वांगीण विकास व्हावा त्यासाठी आईची होणारी तळमळ त्यातूनही ती सावरत असताना तीची होणारी फरफट आणि त्यातून तीला काय मार्ग सापडतो ? मुलामध्ये सर्वांगीण बदल होतो की नाही ?  हे " फरफट " या चित्रपटात मांडले आहे. या सिनेमात प्रमुख कलाकार म्हणुन मेघा डोळस , विजय डाळे , मुग्धा पुराणिक , अक्षदा मोरे , दीक्षा मोरे , विद्या गायकवाड , लक्ष्मी पंधे,  सुदेश चव्हाण , यशवंत मुसळे , दिनेश लांडगे , मंदार रेळेकर , भारत चव्हाण , दादा लांडगे आणि सुरेश डाळे पाटील यांची वर्णी लागणार आहे. तेव्हा नव्या वर्षाच्या नव मुहूर्तावर जानेवारी महिन्याअखेरीस " फरफट " सिनेमाच्या चित्रिकरणास सुरवात होईल असे निर्मात्या मेघा डोळस यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हंटलं आहे.

No comments