web-ads-yml-750x100

Breaking News

दार अडवणाऱ्या टवाळखोर प्रवाशांमुळे लोकलमधून पडून तरुण गंभीर जखमी

BY - मन्साराम वर्मा ,युवा महाराष्ट्र लाइव - डोंबिवली |
लोकलमध्ये दार अडवणाऱ्या टवाळखोर ग्रुपच्या प्रवाशांमुळे एक तरुण धावत्या लोकलमधून पडून गंभीर जखमी झाल्याची घटना डोंबिवलीत घडली. विशाल गुरव असे जखमी तरुणाचे नाव असून त्याच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.लोकलमध्ये जागा आणि दरवाजा अडवून ठेवणाऱ्या टवाळखोर प्रवाशाच्या ग्रुपवर रेल्वे पोलिसांनी त्वरित कारवाई करावी, जेणेकरून दुसऱ्या प्रवाशांचा जीव वाचेल, अशी मागणीही जखमी गुरव यांनी केली आहे.

No comments