web-ads-yml-750x100

Breaking News

मुरबाड शहरात एका भाजपा पदाधिकार्‍याने खासदार निधीतून शाळा बांधण्याचे काम सुरू असल्याचे सांगुन सुरू केले अनधिकृत इमारत बांधकाम ...!

BY - नामदेव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड, ठाणे |
शासकीय जागेत तसेच खाजगी जागेत इमारती रस्ते,पुल बांधतांना नोंदणीकृत दरतएैवज तयार करून कागदपत्राची खातरजमा करावी तेव्हाच कामांना सुरूवात करावी या आदेशाला  ठाणे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता,मुरबाडचे उपअभियंता,शाखा अभियंता यांनी फाटयावर मारून अनधिकृत बांधकाम इमारत सुरू केली आहे.
            मुरबाड शहरात गणेशनगर रस्त्यावर हॉस्पीटलच्या बाजुला एका भाजपा पदाधिकार्‍याने खासदार निधीतून शाळा बांधण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले जाते परंतू याबद्दल मुरबाड नगरपंचायतीला काहीही कल्पना नाही अशी माहिती कर्मचार्‍यांनी दिली.
            3 डिसेंबर 2019 रोजी उध्दव ठाकरे यांच्या मंत्री मंडळानी हा जी.आर काढला त्यानंतर इमारत बांधकाम उभी करण्यास सुरू केली आहे.सदर जागा महसूल खात्याची असून तलाठी,सर्कल यांनी पंचनामा करून दंडात्मक अहवाल तहसिलदार यांचेकडे पाठवला असताना त्यांना दंड करण्यात आली नाही.मुरबाड शहारातील अशा इमारती विकास  नावाखाली महसूल,जिल्हापरिषद,सार्वजनिक बांधकाम विभागाचे भुखंड हडप केले आहेत.येथे मात्र शिवसेना राष्ट्रवादी काँगे्रसला भाजपा पडली भारी असून नगरपंचायत भाजपाची आहे आणि अधिकारी सर्व खात्याचे भाजपाचेच आहेत त्यांनी उध्दव ठाकरेंच्या सरकारच्या आदेशाला फाटयावर मारले आहे.

No comments