web-ads-yml-750x100

Breaking News

शालेय राष्ट्रीय तायक्वांदो क्रीडा स्पर्धेत विजेत्या मुंबईच्या सुवर्ण कन्या..!

BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
क्रीडा व युवक सेवा संचालनालय यांचे सयुक्त विद्यमाने राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा मध्य प्रदेश (विदिशा) येथे १७ वर्षाखालील मुले व मुली यांची राष्ट्रीय तायक्वांदो क्रीडा स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत मुंबईच्या जयहिंद महाविद्यालयातील कु. श्वेता धनाजी खिळे ३५ किलो खालील वजनी गटात खेळली, हिने याही वर्षी सुवर्ण पदक संपादन केले असून जेव्हा पासुन शालेय क्रीडा तायक्वांदो स्पर्धा खेळण्यास सुरुवात केली, तेव्हा पासुन अद्याप पर्यंत सलग ८ वेळा तिने राष्ट्रीय सुवर्ण पदके मिळवली आहेत. तिच्या ह्या यशामुळे महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागाच्या  वतीने तिला मुंबईमधे जिल्हा क्रीडा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. तसेच दि.२ ते ५ जानेवारी २०२० या दरम्यान  राजस्थान (अलवार) येथे सुरु असलेल्या राष्ट्रीय तायक्वांदो क्रीडा स्पर्धेत १४ वर्ष वयोगटात कु.अक्षदा संदीप घाटे हिने ३५ किलोखालील वजनी गटात राष्ट्रीय कांस्य पदक संपादन केले आहे. सदर दोन्ही खेळाडूंचे एस. डब्लूज अकादमीचे अध्यक्ष श्री. दिपक शेडे, सदस्य श्री.संजय जेधे, श्री. जयेश भद्रिके  माजी तायक्वांदोपटू खेळाडू ए.पी.आय. श्री. विशाल चंदनशिवे प्रशिक्षक श्री. संतोष वाळुंज, सह प्रशिक्षक श्री. स्वप्निल करदेकर यांचे अनमोल सहकार्य लाभले.

No comments