web-ads-yml-750x100

Breaking News

छावा लीग फुटबॉल स्पर्धेत साईबाबा पथ शाळा अव्वल ...!

BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या व आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून साकार करण्यात आलेल्या छावां फुटबॉल स्पर्धेत आठ वर्ष खालील वयोगटात प्रथम क्रमांक साईबाबा पथ मुंबई पब्लिक स्कूल लालबाग परळ,  मुंबई एज्यूको इंडिया या शाळेने पटकाविला.
अंधेरी पश्चिम येथील शहाजी राजे क्रीडा संकुल येथे या स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या होत्या. मुंबई महानगर पालिका १७ विभागातून विजयी झालेल्या संघांचा समावेश करण्यात आला होता. ८ वर्ष खालील वयोगटात साईबाबा पथ मुंबई पब्लिक स्कूल शाळेने विजय मिळवला व  छावा कप २०१९-२०२० पटकाविला. फायनल मध्ये जी.अम.रफी.स्कूल वर २-० ने मात करून विजय मिळवला. या विजयात दक्ष सावंत , अक्षर पुजारी , श्रेयस , गीता यानी चांगली खेळी केली. प्लेअर ऑफ द मॅच दक्ष सावंत यांची निवड झाली. पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मुंबई महापौर किशोरी ताई पेडणेकर यांच्या हस्ते करण्यात आला प्रमुख पाहुणे म्हणून, मुंबई शिक्षण समिती अध्यक्ष अंजली ताई नाईक , शिक्षण अधिकारी पालकर सर ,दिनेश नायर सर उपस्थित होते. ही स्पर्धा शारीरिक शिक्षण विभाग वरिष्ठ पर्यवेक्षक प्रमुख श्री रामेश्वर लोहे सर , घाडगे सर , कनिष्ठ पर्यवेक्षक दत्तू लवटे सर यानी विद्यार्थ्यांचे  कौतुक केलं आहे शाळेच्या विजयात फुटबॉल कोच छगन चौहान सर तसेच शारीरिक शिक्षण शिक्षक श्री योगेश साळवी सर यानी खूप मेहनत घेतल्याने हा विजय मिळवला. मुख्याध्यापक गजभिये सर मुख्याध्यापिका श्रीमती मांजरेकर मॅडम, पालक , शाळा व्यवस्थापन समिती .  लालबाग परळ मुंबई येथील विभागातून  सर्वत्र मुलांचे कौतुक केले जात आहे.

No comments