web-ads-yml-750x100

Breaking News

राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल झेन सदावर्ते आणि आकाश खिल्लारे यांचे उपमुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन

BY – युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
राष्ट्रीय वीरता पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल मुंबईची वीरकन्या झेन सदावर्ते आणि औरंगाबादचा आकाश खिल्लारे या वीरसुपुत्राचं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले आहे.
उपमुख्यमंत्री आपल्या अभिनंदन संदेशात म्हणतात, महाराष्ट्र हा वीरांचा, शूरांचा प्रदेश आहे हे आपण पुन्हा एकदा सिद्ध केलंत. आकाशनं स्वत:चा जीव धोक्यात घालून नदीत बुडणाऱ्या माय-लेकींचे प्राण वाचवले. झेननं मुंबईतल्या टॉवरमधल्या आगीशी सामना करीत प्रसंगावधान राखत अनेकांना मृत्यूच्या दारातून परत आणलं. झेन आणि आकाश तुमच्या शौर्याचा महाराष्ट्राला अभिमान आहे. आज राष्ट्रीय पुरस्कारासाठी तुमची निवड झाल्यानं महाराष्ट्रातील बाल-गोपाळांना आनंद झाला आहे. तुमच्या कार्य आणि शौर्यातून त्यांनाही प्रेरणा मिळेल, याची खात्री आहे.

No comments