Breaking News

शेतकर्‍यांचा नायक राज्यमंत्री बच्चु कडु यांचा दणका;दोन्ही कामचुकार अधिकारांवर त्वरित निलंबित करण्याचे आदेश

BY - युवा महाराष्ट्र लाइव – दर्यापूर |
जिल्ह्यातील दर्यापूर तहसील येथे बुधवार रोजी दुपारी तीनच्या सुमारास राज्यमंत्री बच्चू कडू यांनी तहसील कार्यालयाला आकस्मिक भेट दिली. त्यांच्या या भेटीमुळे तहसील कार्यालयातील अधिकार्‍यांची चांगलेच धाबे दणाणले होते. राज्यमंत्री बच्चू कडू यांनी तहसीलदार यांना तात्काळ आढावा बैठकीचे आयोजन करण्यास सांगितले. या आढावा बैठकीमध्ये तहसील कार्यालयांतर्गत रखडलेल्या कामांची राज्यमंत्र्यांनी माहिती घेतली. या बैठकीदरम्यान संजय गांधी निराधार योजना, पुरवठा विभाग या दोन विषयांवर एक तास बैठक चालली. त्यानंतर काही लाभार्थ्यांनी संजय गांधी निराधार योजना, पुरवठा विभागात संदर्भात वारंवार चकरा मारूनही आमचे काम झाले नाही अशी तक्रार संबंधित नागरिकांनी राज्य मंत्र्यांकडे करताच संजय गांधी निराधार योजनेतील सपना भोवते निरीक्षण अधिकारी, पुरवठा विभागातील प्रमोद काळे, या दोन्ही कामचुकार अधिकारांवर त्वरित निलंबित करण्याचे आदेश तहसीलदार योगेश देशमुख यांना, राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली.
त्यांच्या या आदेशानंतर तहसीलदार यांनी यासंदर्भात पुढील कारवाई करण्याचा अहवाल जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आला आहे. अशी माहिती तहसीलदार योगेश देशमुख यांनी  बोलताना सांगितले . राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या या पहिल्याच निलंबनाच्या कारवाणे आता अधिकाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहे..

No comments