web-ads-yml-750x100

Breaking News

आधार क्रमांक नसलेल्या शेतकऱ्यांनी तातडीने आधारनोंदणी करावी -- जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर

BY - मन्साराम वर्मा,युवा महाराष्ट्र लाइव – ठाणे |
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा  लाभ जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांना मिळावा यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे. आधार क्रमांक हा लाभार्थी निश्चित करण्याचा मुख्य निकष आहे. तरी अद्याप ज्या पात्र शेतकऱ्यांकडे आधार क्रमांक नाही त्यांनी तातडीने आधारनोंदणी  करावी असे आवाहन  जिल्हाधिकारी  राजेश नार्वेकर  यांनी केले आहे.
 शेतकऱ्यांनी आपल्या बँक शाखेशी आधार लिंक करणे आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांनी  बँक खात्यास आधारलिंक  केलेले नाही अथवा ज्यांच्या कडे आधार क्रमांक नाही  त्यांनी आपले बँक खाते तात्काळ आधार लिंक करावे. तसेच ज्यांच्याकडे आधारक्रमांक  नाही त्यांनी आधार नोंदणी प्रक्रिया पूर्ण  केल्यानंतरच त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
या योजनेंमध्ये अल्पमुदत पीक कर्ज व पुनर्गठीत कर्ज यांचा समावेश आहे. १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ या कालावधीत वितरीत केलेले कर्ज, ३० सप्टेंबर २०१९ अखेर थकीत व परतफेड न केलेले कर्ज यांचा २ लाख मर्यादेत समावेश आहे.  कर्जमुक्ती योजनेमध्ये ज्या खात्याची अथवा अल्पमुदत पीक कर्जाचे पुनर्गठन/फेर पुनर्गठन केलेल्या कर्ज खात्याची मुद्दल व व्याजासह थकबाकीची रक्कम २ लाखापेक्षा जास्त असेल, अशी कर्जखाती कर्जमुक्तीच्या लाभास पात्र ठरणार नाहीत. या बाबतचा शासन निर्णय maharashta.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. 

No comments