0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – औरंगाबाद |

नवीन वर्षाचे स्वागत करुन घरी परतताना झालेल्या अपघातामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. दौलताबाद किल्ल्यासमोर मध्यरात्री ही घटना घडली. या अपघातात कार विहिरीत कोसळली. यामध्ये दोन ठार तर 3 जखमी झाले आहेत. रात्री 2 वाजता ही घटना घडली. थर्टीफस्ट पार्टी करुन घरी निघताना हा अपघात झाला. सौरभ नांदापूरकर (वय 29), विरभास कस्तुरे (वय 34) असे दोन्ही मृत मुलांची नावे आहेत. तर नितीन शिशीकर (वय 34), प्रतिक कापडीया (वय 30), मधूर जयस्वाल (वय 30) अशी जखमी तरुणांची नावे आहेत. 

Post a comment

 
Top