0
BY - युवा महाराष्ट्र लाइव - उल्हासनगर |
26 जानेवारी 1950 ला संविधान अंमलात आलं, संविधान लागू झालं, आणि त्याच क्षणी रूढ असलेले सर्व नियम, कायदे संपुष्टात आले आणि माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार प्राप्त झाला.
आज 70 व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने 26 जानवारी 2020 रोजी सकाळी 9:30 ला मुलुंड मुंबई पश्‍चिम येथे  मुलुंड वरिष्ठ पोलीस निरीक्षक माननीय रवी सरदेसाई साहेब यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यावेळी इंडियन सोशल मुव्हमेंट राष्ट्रीय अध्यक्ष सविताताई सोनावणे यांनी संविधान प्रस्ताविकेचे वाचन करून, नंतर ध्वजारोहण करण्यात आले, संपूर्ण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.

मुंबई प्रभारी आयु, वृषाली ताई माने, अनिताताई सोनावणे रिपब्लिकन सेना तसेच इंडियन्स सोशल मुव्हमेंट मुबंई संघटक विजय तुकाराम देठे, वं ब आ मुलुंड तालुका सेक्रेटरी भिमराव देठे, राजु संगारे, रविंद्र माने, इं झ म मुलुंड तालुका अध्यक्ष संजय आव्हाड, वं ब आ ज्येष्ठ कार्यकर्ते फुलचंद पगारे, भा बौ म,आर एन जानराव, संघनायक सहसंपादक सागर पवार,रविंद्र भालेराव,विनोद जगताप,राकेश शिर्के,प्रदीप यादव,जोसफ गंथाली,भरत साळवे,कांबळे गुरूजी,इतर कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत (ध्वजा रोहण) झेंडा वंदन करण्यात आला, तसेच इंडियन सोशल मुव्हमेंट,संविधान लोकजगर परिषद आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले बचत गट आणि संघमित्रा बचतगट याचे पदाधिकारी, कार्यकर्ते व सभासद उपस्थित होते.

Post a comment

 
Top