0
BY – युवा महाराष्ट्र लाइव – नवी दिल्ली |

2019-2020 आर्थिक सर्वेक्षण  संसदेत सादर करण्यात आले आहे. या सर्वेक्षण अहवालात देशाच्या अर्थव्यवस्थेबाबत अनेक महत्त्वपूर्ण बाबी मांडण्यात आल्या आहेत. अहवालात म्हटले आहे की, आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये जीडीपीची वाढ 6 ते 6.5 टक्क्यांच्या दरम्यान असेल.मुख्य आर्थिक सल्लागार (सीईए) कृष्णमूर्ती व्ही. सुब्रमण्यम दुपारी 1.45 वाजता पत्रकार परिषद घेऊन आर्थिक सर्व्हेबद्दल सविस्तर माहिती देतील. 2019 च्या सर्वेक्षण अहवालानुसार, भारतीय चलनाच्या संदर्भात रुपयाचे अवमूल्यन झाल्यामुळे जेथे 2018-19 मध्ये निर्यात वाढली तर आयातीमध्ये घट झाली. पण, एका वर्षा पूर्वीच्या तुलनेत परकीय चलन साठा कमी झाला आहे. सन 2018-19 मध्ये परकीय चलन साठा 424 अब्ज डॉलर होता जो 2019-20 मध्ये 412.9 अब्ज डॉलर्स इतका होता.

Post a comment

 
Top