Breaking News

तारापूर कंपनीतील स्फोट; मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख रुपये मदत

BY – युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
तारापूर औद्योगिक वसाहतीतील रासायनिक कंपनीत झालेल्या स्फोटातील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रत्येकी 5 लाख रुपये घोषित केले असून जखमींना संपूर्ण वैद्यकीय साहाय्य दिले जावे, असे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.
स्वतः मुख्यमंत्री हे बचाव कार्यावर लक्ष ठेऊन असून एनडीआरएफची मदतही घेण्यात येत आहेमुख्यमंत्र्यांनी आज स्फोटाची माहिती मिळताच तात्काळ मुख्य सचिव व जिल्हा प्रशासनाकडून माहिती घेतली तसेच यामधील बचाव कार्यावर आणि जखमींच्या उपचारावर प्राधान्य द्यावे असे निर्देश दिले आहेत.

No comments