BY – युवा महाराष्ट्र
लाइव – नवी दिल्ली |
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आसामच्या दोन जिल्ह्यांमध्ये
(दिब्रुगड आणि चरैदेव) ग्रेनेडच्या माध्यमातून 4 मोठे स्फोट घडवून आणले गेले. प्रजासत्ताक दिनाच्या
सोहळ्यासंदर्भात देशभरात उत्सवाचे वातावरण असताना रविवारी सकाळी हे स्फोट घडले आणि
कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. राज्यात 4 ठिकाणी ग्रेनेडचा स्फोट झाला. हे तीन
स्फोट दिब्रूगड जिल्ह्यात आणि एक स्फोट चारैदेव येथे घडले. परंतु, अद्याप या स्फोटात
कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती आहे.
Post a comment