0
BY – युवा महाराष्ट्र लाइव – नवी दिल्ली |
36 केंद्रीय मंत्री जम्मू-काश्मीरचा दौरा करणार असल्याचे वृत्त आहे. केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरसाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. त्या सांगण्यासाठी तसेच कलम 370 हटवण्याचे फायदे सांगण्यासाठी मंत्र्यांचा हा दौरा असणार आहे. यावेळी हे मंत्री जम्मू-काश्मीरमधील जनतेशी संवाद साधून त्यांना या योजनेची माहिती सांगतील. केंद्र सरकारमधील 36 मंत्री हे 18 जानेवारीपासून हा दौरा सुरू करणार आहेत. यामध्ये केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी, रविशंकर प्रसाद, पीयूष गोयल, जितेंद्र सिंह, अनुराग ठाकूर यांच्यासह 36 मंत्री या दौऱ्यात सहभागी होतील.
17 जानेवारी रोजी हा दौरा निश्चित केला जाणार असल्याचे बोलले जात आहे. 18 जानेवारीपासून हा दौरा सुरू होणार असल्याची माहिती केंद्र सरकारने राज्य सरकारला पाठवलेल्या पत्रात दिली आहे. केंद्र सरकारने 5 ऑगस्ट रोजी जम्मू काश्मीरमधील कलम 370 रद्द केले होते. यानंतर केंद्रीय मंत्र्यांचा हा पहिला दौरा असणार आहे. यासोबतच केंद्र शासित राज्य बनवल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये राबवण्यात येत असलेल्या योजनांची माहिती सर्वसामान्य लोकांना सांगण्यासाठी केंद्रीय मंत्री हा दौरा करत आहेत.

Post a comment

 
Top