web-ads-yml-750x100

Breaking News

भारताच्या स्वातंत्र लढयात शहीद वीरभार्इ कोतवाल व शहीद हिराजी गोमाजी पाटील यांच्या शौर्य लढयावर चित्रपट ; पहा येत्या 24 जानेवारीला

BY - कुणाल शेलार ,युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड |
भारताच्या लढयाला अनेक थोर सुधारक होऊन गेले ज्यांनी आपल्या बलिदानाची आहुती दिल्या त्यापैकी शहीद वीरभार्इ कोतवाल,शहीद हिराजी गोमाजी पाटील हे एक नाव आहे.ज्यांनी आपल्या मायभुमिच्या रक्षणासाठी आणि नागरिकांवर ब्रिटिशांची पिळवणूक थांबविण्यासाठी आपल्या जीवाची कोणतीही पर्वा न करता देशासाठी शहीद झाले असे क्रांतीवीर शहीद विठ्ठल लक्ष्मण कोतवाल उर्फ वीरभार्इ कोतवाल,शहीद हिराजी गोमाजी पाटील यांच्या जीवनावर व अखेर पर्यंत ब्रिटीशांशी लढा देऊन आपल्या भारत देशाच्या नाग्रिकांवर अन्याय अत्याचार करणार्‍या ब्रिटीश सरकारला कळ कि पळ करून सोडले अशा शहीदांच्या लढयाला सलाम करत त्यांच्यावर शहीद वीरभार्इ कोतवाल,हिराजी गोमाजी पाटील म्हणून चित्रपट बनविण्यात आला आहे.हा चित्रपट एका ग्रामीण भागाच्या शेतकरी मुलानी काढून लेखन केले आहे.त्या चित्रपटाचे दिग्दर्शकही स्वतः ते राहून या चित्रपटात त्यांचीही भुमिका एक देशभक्त म्हणून ब्रिटीशांशी लढा करतांना दिसणार आहे असे शहीद वीरभार्इ कोतवाल हिराजी गोमाजी पाटील चित्रपटाचे दिग्दर्शक एकनाथ देसले...
            वीरांच्या शौर्य गाथांची विचारधारा मनात बाळगून ज्या शहीदांमुळे आपण आज स्वातंञ्य मिळविले आहे ज्या शहीदांमुळे सिध्दगडाची ओळख आहे ज्या सिध्दगडावरच शहीदांनी आपले बलिदान दिले,व आजच्या युगातील तरूणांना व्यर्थ न हो बलिदान याचे अर्थ कळाले नाही,ज्यांनी आत्मसात केले नाही अशा थोर क्रातीकारक आझाद दस्त्यांचे शहीदांच्या लढयावर हा चित्रपट येत्या 24 जानेवारी 2020 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात सिनेमागृहात रूपेरी पडदयावर येत आहे.मिडीया प्रोडक्ट प्रविण दत्तात्रय पाटील या चित्रपटाचे निर्माते असून सिध्देश देसले,सागर हिंदूराव  यांनी सहनिर्माते म्हणून काम पाहिले आहे.दिग्दर्शन एकनाथ देसले तर पराग सावंत यांनी केले असून अभिनेता अशितोष पत्की यानी शहीद वीरभार्इ कोतवाल यांची भुमिका तर परेश हिंदूराव शहीद हिराजी गोमाजी पाटील यांची भुमिका साकारली आहे.त्याचबरोबर शहीद वीरभार्इ कोतवाल यांच्या पत्नी इंदू ताईंची भुमिका अभिनेत्री ऋतुजा भागवे यांनी महत्वपुर्ण साकारली आहे.अरूण नलावडे,अभिनेत्री निशिगंधा वाड,माधवी निमकर यांच्यासह अन्य कलाकालांच्याही भुमिका या चित्रपटात दिसणार असून या मराठी चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले असून मोठया प्रमाणात या चित्रपटाला प्रोत्साहन मिळत असून हा चित्रपट गाजणार यात शंका नाही.या चित्रपटाला आपण आपल्या कुटूंबासह आपल्या परिसरातील चित्रपटात येत्या 24 जानेवारी 2020 रोजी पाहण्यास जावे असे सर्व नागरिकांना,प्रेक्षकांना आमच्या युवा महाराष्ट्र लार्इव्ह वृत्तवाहिनीच्या माध्यमातून सांगितले आहे.
No comments