Breaking News

निर्भया प्रकरणातील चारही आरोपींनी 22 जानेवारीला फाशी

BY - युवा महाराष्ट्र लाइव - नवी दिल्ली  |
2012 मधील निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणात दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने मंगळवारी चार दोषींना फाशीचे वॉरंट जारी केले. या चौघांना 22 जानेवारी रोजी सकाळी 7 वाजता फाशी देण्यात येईल. यापूर्वी पटियाला हाऊस कोर्टाच्या न्यायाधीशांनी चारही दोषींवर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. यावेळी माध्यमांनाही आत जाऊ दिले नाही. सुनावणी दरम्यान निर्भयाची आई आणि दोषी मुकेशची आई न्यायालयात रडली. महत्त्वपूर्ण म्हणजे निर्भया प्रकरणात अक्षय, मुकेश, विनय आणि पवन या चारही दोषींना यापूर्वीच फाशी देण्याचा निर्णय न्यायलयाने दिला आहे.

No comments