Breaking News

खासगी बस पलटी; एकाचा मृत्यू 21 जखमी

BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
सोल्लोडच्या पालोदजवळ आज सकाळी खाजगी बस पलटी झाल्याची घटना घडली.या घटनेत एकाचा जागीच मृत्यू झाला तर 21 जण जखमी झाले आहेत. यामध्ये 13 जखमींची अवस्था गंभीर आहे. त्यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेनंतर बस चालक फरार झाला आहे.यात्रेकरूना गंगासागर येथे घेऊन जाणाऱ्या या खाजगी बसला अपघात झाला. अचानक ही बस रस्त्याच्या कडेला पलटी झाली. यामध्ये दामोदर लक्षण खैरनार यांचा जागीच मृत्यू झाला. ते मुंबईचे रहिवाशी होते. आपल्या कुटुंबासह ते प्रवास करत होते. यामध्ये बसमधील इतर 21 जण गंभीर जखमी झाली असून 13.जणांची अवस्था गंभीर आहे.या घटनेची माहिती सिल्लोड पोलीसांना मिळताच त्यानी घटनास्थळी धाव घेत औरंगाबाद येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. त्यांच्यावर उपचार सूरु आहे. या घटनेनंतर बस चालक फरार झाला होता. या चालकाचा पोलीस शोध घेत आहेत.

No comments